आरोग्य सेवेला रिक्तपदांचे ग्रहण
By Admin | Updated: September 11, 2014 00:36 IST2014-09-11T00:29:10+5:302014-09-11T00:36:32+5:30
शेषराव वायाळ, परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद मागील एक दीड वर्षांपासून रिक्त आहे.

आरोग्य सेवेला रिक्तपदांचे ग्रहण
शेषराव वायाळ, परतूर
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद मागील एक दीड वर्षांपासून रिक्त आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या जागाही रिक्त असल्याने रूग्णांवर उपचार करतांना अडचणी येत आहेत.
एकूणच या रुग्णालयाचा कारभार प्रभारीवरच असल्याने समस्या वाढल्या आहेत.
परतूर ग्रामीण रूग्णालयास मागील एक दीड वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे. या रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रूग्ण येतात. सध्या साथीच्या रोगांचा काळ आहे. गॅस्ट्रो, हिवतापाचे रूग्ण वाढले आहेत. या रुग्णालयास एक अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. परंतु, सध्या दोनच वैद्यकीय अधिकारी आहेत. यातील एक रजेवर आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हा दवाखाना सुरू आहे. आयुष कक्षाचे तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र ते फक्त बाह्य रुग्ण तपासणीच करतात. एक्स रे तंत्रज्ञ नसल्याने रूग्णांना अडचण येत आहे. लॅब टेक्नीशियनची व औषध निर्माताची बदली झाली आहे. एकूणच हा दवाखाना प्रभारीवर सुरु असल्याने रूग्णालयात अडचणी वाढल्या आहेत. तालुक्यातील रुग्णांची गैरसोय लक्षात घेता रिक्त जागा तात्काळ भरव्यात अशी मागणी होत आहे.