आरोग्य मंत्र्यांनी साधला
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:09+5:302020-11-28T04:07:09+5:30
\Sविमानतळावरील तपासणी केंद्राला भेट --- औरंगाबाद - दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोनाची तपासणी केली जात आहे. गुरुवारी मुंबईहून औरंगाबादच्या ...

आरोग्य मंत्र्यांनी साधला
\Sविमानतळावरील तपासणी केंद्राला भेट
---
औरंगाबाद - दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोनाची तपासणी केली जात आहे. गुरुवारी मुंबईहून औरंगाबादच्या विमानतळावर आलेले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मनपाच्या तपासणी पथकाशी संवाद साधून काम कसे चालले हे जाणून घेतले.
तपासणी कोणाची केली जाते. आरटीपीसीआर आणि ॲण्टीजेन पैकी कोणती तपासणी केली जाते. अहवाल केव्हा येतो याची विचारणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. पथकाचे प्रमुख डाॅ. अंकुश जाधव यांनी माहिती दिली. यावेळी डाॅ. कोमल नरवडे, संदेश इंगोले यांची उपस्थिती होती. सध्या दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यातही लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी केली जात असल्याचे सांगतांना प्रवाशांची संपर्क माहिती संकलित केली जात असल्याचे डाॅ. जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सध्या दिल्लीच्या प्रवाशांचीच तपासणी केली जात असून इतर ठिकाणांहून आलेल्या इच्छुक प्रवाशांचीही तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले.