शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग सरसावला

By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST

पालम : शहरातील १४ वर्षीय मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग २२ सप्टेंबर रोजी पालम शहरात धूरफवारणी व कोरडा दिवस पाळण्यासाठी सरसावला़

पालम : शहरातील १४ वर्षीय मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग २२ सप्टेंबर रोजी पालम शहरात धूरफवारणी व कोरडा दिवस पाळण्यासाठी सरसावला़पालम येथे सोमवारी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी विविध उपाययोजना राबविण्यात व्यस्त झाले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर ब्याळे यांनी आरोग्य कार्यालयात सकाळच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन विविध उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आज दिवसभर ताप सर्वेक्षण, पाणी साठ्यांची तपासणी, पाणी साठे रिकामे करणे, पाण्यामध्ये औषधी टाकणे, तापीच्या संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणी आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छता व साफसफाई करण्याच्या सूचना देणारी पत्रे पाठविण्यात आली आहेत. डासांच्या निर्मूलनासाठी व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ब्याळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश खंदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश राजूरकर, साथ रोग अधिकारी डॉ. संगीता भंगे, कृष्णा साळवे, शेख लड्डू भाई, गवळे आदींसह कर्मचारी सहभागी झाले आहेत.डासांचे निर्मूलन करण्यासाठी पाणीसाठे रिकामे करून कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. तसेच घराजवळील खराब झालेले टायर, नादुरुस्त कुलर व प्लास्टिकच्या साहित्याचा नायनाट करावा, झोपताना अंगावर पूर्ण कपडे घालावेत, आजुबाजूच्या परिसरातील घाण साफ करावी, डासांपासून संरक्षण मिळण्यासाठी औषधींचा वापर करावा व कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर ब्याळे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश खंदारे यांनी केले आहे.