मेरखेडा येथे आरोग्य पथकाकडून तपासणी

By Admin | Updated: April 9, 2015 00:11 IST2015-04-08T23:56:35+5:302015-04-09T00:11:45+5:30

केदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेरखेडा गावात डेंग्यू सदृश तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे सविस्तर वृत प्रसिध्द केले़ हे वृत्त प्रसिध्द होताच या गावात आरोग्य पथक दाखल झाले़

Health check up at Merkheda | मेरखेडा येथे आरोग्य पथकाकडून तपासणी

मेरखेडा येथे आरोग्य पथकाकडून तपासणी


केदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेरखेडा गावात डेंग्यू सदृश तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे सविस्तर वृत लोकमतने दि़८ रोजी प्रसिध्द केले़ हे वृत्त प्रसिध्द होताच या गावात आरोग्य पथक दाखल झाले़
आरोग्य पथकाने केलेल्या सर्वेक्षणात गावात जवळपास २५ रुग्ण तापाने तर २० पेक्षा अधिक रुग्ण जालना, औरंगाबाद, भोकरदन ठिकाणी खासगी दवाखाण्यात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या गावात सांडपाणी, नाल्यांद्ववारे वाहून न जाता एकाच ठिकाणी तुंबत असल्याने आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परंतु हा आजार आटोक्यात आण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचातच्या वतीने प्रत्येक घरासमोर शोषखडे तयार करुन देणार आहेत. सांडपाणी नाली सफाईचे काम तात्काळ हाती घेतले असल्याचे ग्रामसेवक एस़आऱपडोळ, सरपंच गोविंदराव बकाल यांनी सांगितले़तर गावात आलेल्या आरोग्य पथकाने घरोघरी भेटी दिल्या.
साथरोग, किटकजन्य रोग, स्वच्छता व जनजागृती, जलजन्य व किटकजन्य आजाराबाबत माहिती देऊन पिण्याच्या पाण्यात औषधी टाकल्या. डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
काही रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ एस़जी़लटपटे यांनी सांगितले. या पथकात आरोग्य सहाय्यक एस़एम़ आक्से, प्रयोगशाळा तत्रंज्ञ के़ आऱ सोनार, आरोग्य सहाय्यक पी़ ए.भोंगाडे, आरोग्य सेवक व्ही़ आऱ सहाणे, व्ही़ बी़ पाटसावणे, ए. एम़ ठोंबरे, व्ही़ डी़ सोनवणे, दांडगे आदींचा समावेश होता़
या गावातील डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण वाढतच असून, आरोग्य विभागाने विशेष पथकाद्वारे गावात तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.

Web Title: Health check up at Merkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.