शहरात चार ठिकाणी उभारणार सुविधायुक्त आरोग्य केंदे्र
By Admin | Updated: May 6, 2015 00:30 IST2015-05-06T00:13:05+5:302015-05-06T00:30:45+5:30
बीड : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरात चार ठिकाणी नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार असून याचा प्रस्ताव नगर पालिकेने अभियान संचालकांकडे पाठविले आहेत.

शहरात चार ठिकाणी उभारणार सुविधायुक्त आरोग्य केंदे्र
बीड : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरात चार ठिकाणी नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार असून याचा प्रस्ताव नगर पालिकेने अभियान संचालकांकडे पाठविले आहेत. यामध्ये तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे असतील आणि एकाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. तसचे एक कम्यूनिटी हेल्थ सेंटरही (रेफरल हॉस्पीटल) उभारण्यात येणार असल्याने लाखो बीडकरांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी पालिकेचा हा विकासात्मक निर्णय बोलले जात आहे.
गत महिन्यात सर्वत्रच डेंग्यू आणि मलेरीयाची साथ पसरली होती. यामध्ये अनेकांचा बळी गेला होता, हे वास्तव आहे. साथरोगांसह इतर आजाराने जडलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गर्दी होऊ लागली होती. तसेच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत होती, हाच धागा पकडून बीड पालिकेने बीडकरांच्या आरोग्याची काळजी घेत शहरात तीन ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जुन्या एका आरोग्य कें्रद्राच्या नुतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविला असून त्यामध्ये कम्यूनिटी हेल्थ सेंटरचाही समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश जायभाये यांनी सांगितले.
बीडमध्ये पहिल्यांदाच ही योजना
या अभियानांतर्गत पहिल्यांदाच बीडमध्ये आरोग्य केंद्रे उभारले जात आहेत. बीडनंतर अंबाजोगाई, परळी येथे या योजनेचा लाभ घेण्यात आला असल्याचे उपमुख्याधिकारी अब्दुल सत्तार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)