मुख्याध्यापकाला धारूरमध्ये मारहाण
By Admin | Updated: November 2, 2015 00:16 IST2015-11-02T00:09:47+5:302015-11-02T00:16:24+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला शिवीगाळ मारहाण करून खिशातील पैसे काढून घेणाऱ्याविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मुख्याध्यापकाला धारूरमध्ये मारहाण
उस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला शिवीगाळ मारहाण करून खिशातील पैसे काढून घेणाऱ्याविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शनिवारी दुपारी धारूर येथे घडली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरूण बनसोडे हे शुक्रवारी शाळेत कामकाज करीत असताना तेथे आलेल्या काकासाहेब शिंदे याने ५०० रूपयांची मागणी केली़ मुख्याध्यापक बनसोडे यांनी पैसे देत नाही म्हटल्यावर शिंदे याने टेबलावरील हजेरी पुस्तक फाडून टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडील १५० रूपये बळजबरीने काढून घेतले़ दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी मुख्याध्यापक बनसोडे कार्यालयात कामकाज करीत असताना तेथे आलेल्या काकासाहेब शिंदे याने बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून ढकलून देत मारहाण केली़ तसेच त्यांच्या खिशातील ५०० रूपये बळजबरीने काढून घेतल्याची फिर्याद बनसोडे यांनी शनिवारी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली़
मुख्याध्यापक बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदे याच्याविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ प्रिती टिपरे या करीत आहेत़ (प्रतिनिधी)