मुख्याध्यापक, शिक्षकात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:56 IST2017-09-17T00:56:22+5:302017-09-17T00:56:22+5:30
शिऊर येथील संत बहिणाबाई कन्या प्रशालेत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात प्रलंबित बिल न पाठविल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली

मुख्याध्यापक, शिक्षकात हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई कन्या प्रशालेत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात प्रलंबित बिल न पाठविल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी (दि.१६) दोघांनीही शिऊर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी सांगितले की, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता प्रलंबित बिल काढण्याची मागणी करताच मुख्याध्यापक उत्तम सानप यांच्यासह बापू पवार व हरी तुपे यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सहशिक्षक पोपट आगवान यांनी दिली.
यानंतर मुख्याध्यापक उत्तम सानप यांनीदेखील प्रशालेतील सहशिक्षक पोपट आगवान यांनी माझे प्रलंबित बिल का पाठविले नाही म्हणून शिवीगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. यावरून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, संस्काराचे धडे देणाºयांनीच असे वर्तन केल्याने गावात नाराजी व्यक्त होत आहे.