मुख्याध्यापकास मारहाण

By Admin | Updated: March 10, 2017 00:22 IST2017-03-10T00:21:31+5:302017-03-10T00:22:52+5:30

जालना : माझी गैरहजरी का लिहिली, या कारणावरून मुख्याध्यापकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरूवारी आयशा उर्दू हायस्कूल टेंभूर्णी (ता. जाफराबाद) येथे घडली.

Headmaster beaten up | मुख्याध्यापकास मारहाण

मुख्याध्यापकास मारहाण

जालना : माझी गैरहजरी का लिहिली, या कारणावरून मुख्याध्यापकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरूवारी आयशा उर्दू हायस्कूल टेंभूर्णी (ता. जाफराबाद) येथे घडली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून हबीब यदरूस हबीब मोहम्मद मुख्याध्यापक आयशा उर्दू हायस्कूल यांच्या फिर्यादीवरून वशिम अक्रम गुलाब नबी यांच्या विरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोठ्यातून गाय चोरीस
गोठ्यात बांधलेली गाय चोरून नेल्याची घटना जालना शहरातील बुऱ्हाणनगर येथे घडली. याप्रकरणी उमर अस्लम परसुवाले यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहित्य चोरीस
चोरट्यांनी कार्यालयाचे शटर तोडून कपाटातील रोख १८ हजार ७२९ रूपये डि.व्ही.डी. आणि कॉप्युटरची हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना मार्कंडेय नगर येथे बुधवारी मध्यरात्री घडली. हनुमंत आबासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन जुगाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल
संगनमत करून सोरट नावाच्या जुगार खेळतांना आढळून आल्याने घटना बुधवारी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे घडली. पोलीस नाईक बाळू शेटे यांच्या फिर्यादीवरून गोकुळ शामराव कट्टे, राजेश मदन कांबळे, कल्याण बोचरे यांच्या विरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोटरसायकलची धडक
भरधाव मोटरसायकने धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी परतूर तालुक्यातील सोयगाव पाटीजवळ घडली. वसंत गोपीचंद राठोड घोन्सी तांडा यांच्या फिर्यादीवरून मोटरसायकल (एम.एच.२१ सी. १५२४) च्या चालकाविरूध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Headmaster beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.