नागद ( छत्रपती संभाजीनगर: गौताळा घाटात ‘सन्सेट पॉइंट’च्या खाली एक पुरुष जातीचा डोके छाटलेला मृतदेह, तर रस्त्याच्या बाजूला त्याचे मुंडके आढळले. मृताचे वय अंदाजे वीस ते तीस वर्षे असावे. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही बाब समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
गौताळा घाटात सन्सेट पॉइंटजवळ कुजलेल्या अवस्थेतील आणि डोके नसलेला मृतदेह आढल्याची माहिती अज्ञाताने गुरुवारी (दि. ४) कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यास कळवली. मृताच्या अंगावर चॉकलेटी रंगाची अंडरवेअर होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून याप्रकरणी नोंद घेतली. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. डॉ. खान आणि त्यांचे सहकारी संजय पाटील, शेखर चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन केले.
दरम्यान, कन्नड ग्रामीण पोलिसांनी विविध ठाण्यांमध्ये मीसिंगबाबत चौकशी केली. परंतु, रात्री उशिरापर्यंत मृतदहाची ओळख पटली नव्हती. याप्ररकणी पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात नागद पोलिस चौकीचे जमादार प्रदीप पवार हे तपास करत आहेत.