शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जुगारात पैसे जिंकून घरी निघाला; पुन्हा जुगार खेळ म्हणत पाच जणांचा तरुणावर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:35 IST

गौतमनगर परिसरातील घटना; सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : जुगारात पैसे जिंकल्यावर तेथून घरी जाणाऱ्या तरुणाला पाचजणांनी रोखले. पुन्हा जुगार खेळायला बस म्हणत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. पिस्तूलसदृश शस्त्र दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली. तसेच, त्याच्याकडील ११ हजार रुपये हिसकावून घेतले. ही घटना आंबेडकरनगरातील गौतमनगरात १८ जूनच्या रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

टिक्या आदमाने, अजय आदमाने, मुन्ना, दाद्या आणि मनोहर आदमाने (सर्व रा. गल्ली नं. १५, आंबेडकरनगर), अशी आरोपींची नावे आहेत. यातील मनोहरला पोलिसांनी अटक केली. राहुल हिवराळे (रा. नवभारत सोसायटी, एन ८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी तो आंबेडकरनगरातील गौतमनगर येथील गल्ली नं. १५ येथे मन्नू दाजी याच्या अड्ड्यावर दारू प्यायला. नंतर त्याच्याच घरात सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर जाऊन बसला. तेथे तो १० ते ११ हजार रुपये जिंकला. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला. तेव्हा आरोपींनी त्याला रोखले. 

टिक्याने त्याला परत खेळायला बस म्हणून धमकावले. पैसे जिंकल्यानंतर असे निघून जाऊ शकत नाही, असे सांगून शिवीगाळ व मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. तो बराच वेळ रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. आरोपींनी ११ हजार रुपये हिसकावून घेतले. एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला दवाखान्यात दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी मनोहरला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर