माळीवाडा येथून दोन बैलांसह गाय चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:05 IST2021-02-13T04:05:16+5:302021-02-13T04:05:16+5:30

दौलताबाद : माळीवाडा येथे शेतातील गोठ्यात बांधलेल्या बैलांची जोडी व एक गाय अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याप्रकरणी दौलताबाद ...

He stole a cow with two oxen from Maliwada | माळीवाडा येथून दोन बैलांसह गाय चोरीला

माळीवाडा येथून दोन बैलांसह गाय चोरीला

दौलताबाद : माळीवाडा येथे शेतातील गोठ्यात बांधलेल्या बैलांची जोडी व एक गाय अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

जनार्धन उत्तमराव मुळे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात दोन बैल व एक गाय बांधून ठेवली होती. या जनावरांचा चारा पाणी करुन ते रात्री आठ वाजता घराकडे परत आले. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते शेतात गेल्यानंतर त्यांना गोठ्यातील बैलजोडीसह गाय गायब असल्याचे आढळले. त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली, तसेच शोध घेतला. मात्र जनावरे सापडले नाहीत. यानंतर त्यांनी दौलताबाद पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अलीकडील काळात परिसरातील गावांत जनावरे चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन महिन्यात २३ गोधनाची चोरी झाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: He stole a cow with two oxen from Maliwada