शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

सोबत राहण्यास नकार दिल्याने पत्नीला संपवले; अडीच तासात पती जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 20:08 IST

Husband Killed Wife : पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी अवघ्या अडीज तासात जेरबंद केले

वाळूज महानगर : पत्नीने तोंडी घटस्फोट देऊन सोबत राहण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.१८) रांजणगावात उघडकीस आली होती. पत्नीचा खून करून फरार झालेला पती किरण खिल्लारे यास गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अवघ्या अडीच तासात गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरात जेरबंद केले.

शिवकन्या किरण खिल्लारे (२५, रा. दत्तनगर, रांजणगाव) या महिलेचा पती सतत दारू पिऊन तिला त्रास देत असल्याने तिने पतीला तोंडी घटस्फोट दिला होता. यानंतर शिवकन्या ही दीड वर्षाची मुलगी हर्षदाला सोबत घेऊन रांजणगावात किरायाच्या घरात राहण्यासाठी आली होती. शिवकन्या वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामासाठी जात होती. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी शिवकन्याने तिची आई संगीता ससाणेला (रा. परभणी) हर्षदास सांभाळण्यासाठी रांजणगावात बोलावून घेतले होते. गुरुवारी सायंकाळी शिवकन्याचा पती किरण हा पत्नीच्या घरी गेला आणि मुलगी हर्षदाला सोबत घेऊन गेला. शिवकन्या कंपनीतून घरी आल्यावर पती किरणने ‘मी तुझे साहित्य परत देतो,’ असे म्हणून तिला लगतच्या खोलीत घेऊन गेला.

यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास किरणने घराचा दरवाजा बंद करून पत्नी शिवकन्यावर धारदार वस्तूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. शिवकन्याचा आवाज ऐकून तिची आई संगीता ससाणे मदतीसाठी गेल्या; पण दरवाजा बंद असल्याने त्या काहीच करू शकल्या नाहीत. घरमालकीण जनाबाई पवार यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्या तरुणाने लाथ मारून दरवाजा तोडला. यावेळी शिवकन्या रक्तबंबाळ अवस्थेत दरवाजाबाहेर येऊन कोसळली. यानंतर किरण खिल्लारे हातातील धारदार वस्तू फेकून देत अंधारात पसार झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच रांजणगावचे माजी सरपंच मोहनीराज धनवटे, दीपक सदावर्ते यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी शिवकन्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

फरार पती रेल्वे स्टेशनवर जेरबंदशिवकन्याचा खून केल्यानंतर पती किरण पसार झाला होता. पोलीस उपायुक्त अर्पणा वनकर, सहा. पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोकॉ. अविनाश ढगे, योगेश शेळके, कच्चे, वाघ आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एमआयडीसी वाळूज व गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्डवर सापळा रचला होता. किरणचे मोबाइल लोकेशन रेल्वे स्टेशन परिसरात दिसल्याने पोहेकॉ. दशरथ खोसरे, पोकॉ. पवार व गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास सापळा रचून रेल्वेमधून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या किरण केशव खिल्लारे (रा. देगाव जि. नांदेड) यास शिताफीने पकडले. किरणला न्यायालयात हजर केले असता २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक मदनसिंग घुनावत करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू