‘तो’ तोतया पोलीस निरीक्षक जेरबंद
By Admin | Updated: April 3, 2017 22:29 IST2017-04-03T22:25:28+5:302017-04-03T22:29:53+5:30
परळी: मुंबई क्र ाईम ब्रँचचा सिनीअर पी.आय.लावट बोलतो, असे सांगून येथील सराफा व्यापारी सुमित सुरेश टाक यांना शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या एकास शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली.

‘तो’ तोतया पोलीस निरीक्षक जेरबंद
परळी: मुंबई क्र ाईम ब्रँचचा सिनीअर पी.आय.लावट बोलतो, असे सांगून येथील सराफा व्यापारी सुमित सुरेश टाक यांना शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या एकास शहर पोलीसांनी सोमवारी (उपळी ता.वडवणी) येथून अटक केली.
निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (रा.शांतीनगर, डोंगरी, जनकल्याण बिल्डींग ए.आर.ए १ चौथा माळा, रूम नं.४०८, मुंबई ) असे तोतया पोलिसाचे नाव असून, पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून सराफांकडून त्याने अनाधिकृतपणे वसुली करण्यासाठी तगादा लावला होता. गत महिन्यात सराफा व्यापारी सुमित टाक व संदीप टाक या दोघांना मुंबई क्राईम बँ्रचचा पी.आय.लावट बोलतो, असे भासवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती.व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माऊली फड, नंदलाल बियाणी, शंकर आडेपवार आरोपीस अटक करण्याची मागणी लावून धरली. सराफ बाजारपेठ बंदही ठेवली होती.
शहर ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, जमादार बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड, अर्जुन मस्के यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मोबाईवरील संभाषणाचे डिटेल हस्तगत केले. मात्र, क्राईम ब्रँचचा अधिकारी नसल्याचे उघड झाले. त्यानंतर उपळी ता. वडवणी येथून दुपारी निशांत उर्फ सनी परमारच्या मुसक्या आवळल्या. (वार्ताहर)