साडेसात लाखांचा गांजा पकडला
By Admin | Updated: July 9, 2014 00:13 IST2014-07-08T23:56:14+5:302014-07-09T00:13:27+5:30
शंकरनगर : आंध्रप्रदेशातून खामगावकडे कारमध्ये जाणारा साडेसात लाख रुपयांचा अडीच क्विंटल गांजा रामतीर्थ पोलिसांनी पकडला

साडेसात लाखांचा गांजा पकडला
शंकरनगर : आंध्रप्रदेशातून खामगावकडे कारमध्ये जाणारा साडेसात लाख रुपयांचा अडीच क्विंटल गांजा रामतीर्थ पोलिसांनी पकडला असून गांजासह कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे़
आंध्रप्रदेशातील हैदराबादसह अनेक मोठ्या शहरातून महाराष्ट्राच्या विविध शहरात वारंवार गांजाची तस्करी केली जाते़ ८ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास कारचालक (क्ऱएम़ एच़१२ - सी़ एच़ ५१६५) वसंत राठोड हा गांजा तस्कर चरण सोबत देगलूरहून नांदेडकडे निघाला़ गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यातील सपोनि जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून कारसह कारचालक वसंत राठोड यास ताब्यात घेतले़ यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून गांजा तस्कर चरण फरार झाला़ ही घटना रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली़ रामतीर्थ पोलिसांनी पंचासमक्ष कारमधून २ किलो वजनाची १२५ पाकीटे काढली़ या अडीच क्विंटल वजनाच्या गांजाचे बाजारमूल्य साडेसात लाख रुपये असल्याचे सपोनि जगताप यांनी सांगितले़ या गांजा तस्करास पकडण्याची कामी पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भारती, आऱ बी़ राठोड, नागोराव कानगुले, लक्ष्मण सोनकांबळे, माधव वाडेकर, गोविंद बोईनवाड, मेकलवाड, तेलंगे, नागरगोजे आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)
वास्तविक पाहता रामतीर्थ पोलिसांनी गांजासह कार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नरसी परिसरात पकडली़ रामतीर्थ परिसरातील अनेक ग्रामस्थांनी ही कार सकाळी रामतीर्थ ठाण्यात पाहिली़ सर्वत्र गांजा पकडल्याची चर्चा झाली, पण रामतीर्थचे सपोनि जगताप यांना दुपारी साडेबारा वाजता शंकरनगर स्थानकावर नकली सापळा लावून गांजासह कार पकडल्याची रंगीत तालीम केली़ यावेळी कार चालकाच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या़ तर शिक्षक काळे व अन्य एक शिक्षक तसेच रामतीर्थ प्रा़ आरोग्य केंद्राचे डॉ़ सतीश तोटावार यांना पंच म्हणून हजर केले होते़ या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे़