शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:57 AM

सावंगी जि.प. शाळा : विद्यार्थी मारहाण प्रकरण भोवले

लासूर स्टेशन : येथील ग्रामविकास अधिका-याला सावंगी येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करणे चांगलीच महागात पडली असून, त्यांच्या विरोधात विनापरवानगी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण करून शिक्षा केल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.३ जानेवारी रोजी घडलेल्या या प्रकरणात तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कारवाई करण्यात आली. लासूर स्टेशन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी ३ जानेवारी रोजी सावंगी येथील जि.प. शाळेत विनापरवानगी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले होते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देता आली नाही म्हणून गव्हाणे यांनी त्यांना मारहाण करून शिक्षा केली होती. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. मुख्याध्यापक नारायण कोकरे यांनी या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गव्हाणे यांच्या विरोधात शिल्लेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.गंगापूरचे गटविकास अधिकारी विद्याधर पाटील, विस्तार अधिकारी डी. वाय. दुधे व शाखाधिकारी साहेबराव पाटील यांच्या पथकाने शाळेत येऊन चौकशी केली होती. त्यात ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी विनापरवानगी हा प्रकार केल्याचा अहवाल दिला. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसEducation Sectorशिक्षण क्षेत्र