पळसवाडीत कुलूप तोडून चाळीस हजारांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:02+5:302021-05-18T04:05:02+5:30

प‌ळसवाडी गावात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील किसन देवकर हे दोन महिन्यांपासून कुटुंबीयांसमवेत शेतावर राहण्यासाठी गेले ...

He broke the lock in Palaswadi and lit forty thousand ornaments | पळसवाडीत कुलूप तोडून चाळीस हजारांचे दागिने लंपास

पळसवाडीत कुलूप तोडून चाळीस हजारांचे दागिने लंपास

प‌ळसवाडी गावात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील किसन देवकर हे दोन महिन्यांपासून कुटुंबीयांसमवेत शेतावर राहण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे गावातल्या घराला कुलूप लागले आहे. अज्ञात चोरट्यांनी त्याचा फायदा घेत रविवारी मध्यरात्रीला घराच्या कडी तोडून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी गल्लीतच राहणारे रमेश औटे व भाऊसाहेब ठेंगडे यांच्या घरातून कुरड्या, पापड, तूरडाळ चोरी केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मनोहर पुंगळे, वाल्मीक कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.

170521\img-20210517-wa0032.jpg

पळसवाडी येथे चोरट्यांनी घराचे  कुलुप तोडुन चाळीस हजार रु.किंमतीचे सामान चोरट्यांनी केला लंपास यावेळी पाहणी करतांना पो.नि.सिताराम मेहेत्रे पोलीस मनोहर पुंगळे

Web Title: He broke the lock in Palaswadi and lit forty thousand ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.