शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

बनावट नावांनी जामीन घेऊन त्याने केली चक्क कोर्टाची फसवणूक; आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:24 IST

आरोपीला एकानंतर दुसऱ्या कलमाखालील शिक्षा भोगावयाची आहे

छत्रपती संभाजीनगर : विविध बनावट नावांनी जामीन घेऊन कोर्टाची फसवणूक करणारा आरोपी राजेश किशनराव दाभाडे (४८, रा. भाग्योदय नगर, जालना) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. डी. गुरनुले यांनी विविध कलमाखाली एकूण ५ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंड ठोठावला. एका कलमाखालील शिक्षा भोगल्यानंतर, आरोपीने दुसऱ्या कलमाखालील शिक्षा भोगावी असे आदेशात म्हटले आहे.

असा झाला फसवणुकीचा पर्दाफाशमुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक नितीन राजेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार३ जून २०२१ रोजी ते कार्यालयात दैनंदिन कामकाज करत असताना सिडको पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपी मोबीन अजीज शेख याचा जामीन घेण्यासाठी वकिलामार्फत राजेंद्र हरबक (रा. चापडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याच्या नावे असलेला पी. आर बॉण्ड व इतर दस्ताऐवज सादर करण्यात आले. सदरील कागदपत्रांवरील फोटोवरून सदरील व्यक्तीने यापूर्वी देखील जामीन घेतला असल्याची मराठे यांना शंका आली. त्यांनी तपास केला असता आरोपीने २१ मे २०२१ रोजी मुकुंदवादी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी इम्रान अली रशिद अली या आरोपीचा वकिलामार्फत भागुजी पालवे (रा. करडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याच्या नावे जामीन घेतल्याचे समोर आले. दोन्ही प्रकरणांत नावे वेगवेगळी असून फोटो मात्र एकाच व्यक्तीचा असल्याचे उघडकीस आले. मराठे यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली. न्यायालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. याबाबत वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी आणि शिक्षातपास अधिकारी राहुल भादर्गे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक सरकारी वकील आनंद पाईकराव आणि जे. आय. परकोटे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी राजेश दाभाडे याला दोषी ठरवून भादंवी कलम ४६७ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४२० अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४१९ अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४६८ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि कलम ४७१ अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय