घातक रसायन नदीत सोडणारे रॅकेट जाळ्यात

By Admin | Updated: March 1, 2015 00:10 IST2015-03-01T00:06:05+5:302015-03-01T00:10:25+5:30

वाळूज महानगर : घातक रसायनयुक्त सांडपाण्याचे टँकर खाम नदीच्या पात्रात सोडणाऱ्या रॅकेटचा आज पहाटे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पर्दाफाश केला असून,

Hazardous chemicals in the river rackets trapped | घातक रसायन नदीत सोडणारे रॅकेट जाळ्यात

घातक रसायन नदीत सोडणारे रॅकेट जाळ्यात


वाळूज महानगर : घातक रसायनयुक्त सांडपाण्याचे टँकर खाम नदीच्या पात्रात सोडणाऱ्या रॅकेटचा आज पहाटे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सात टँकरसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये भाजपचे नगरसेवक आगा खान व मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांचा सहभाग असल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
शनिवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलिसांची गस्त सुरू असताना खबऱ्याने घातक रसायनाने भरलेले टँकर खाम नदीत सोडले जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, फौजदार अजय पांडे, फौजदार रेश्मा सौदागर, रमेश सांगळे, परमेश्वर पायगव्हाणे, एस. एम. रोकडे, बाळासाहेब आंधळे, सुनील म्हस्के, संदीप बीडकर, योगेश कुलकर्णी, सय्यद शकील, अनिल कदम आदींच्या पथकाने नगर रोडवर नगरसेवक आगा खान मिया खान यांच्या नगर रोडवरील गुजरात फ्राईट ट्रान्सपोर्ट याठिकाणी छापा मारला. या ट्रान्सपोर्टच्या आवारात टँकर (क्रमांक एमएच-०५ एएम-७७९९) मधून पाईपच्या साह्याने संरक्षक भिंतीमधून रसायनयुक्त सांडपाणी खाम नदीपात्रात सोडले जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळी सात रसायनयुक्त टँकर दिसले. यातील दोन टँकरचे पाणी खाम नदीत सोडण्यात आले असून, तिसरा टँकर खाली करताना पोलिसांनी कारवाई केली.
घटनास्थळी असलेल्या आगा खान (३३, रा. कैलासनगर, औरंगाबाद), सुमित श्याम खांबेकर (३३, रा. दलालवाडी) यांच्यासह चंदन नागेंद्रसिंग (२३, रा. रांजणगाव शे.), तुषार तुकाराम पाखरे (२८, रा. गीतानगर, हडको) व अस्लम कलीम शेख (३२, रा.पाथरीकरनगर, औरंगाबाद) या पाच आरोपींना अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Hazardous chemicals in the river rackets trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.