पिके उद्ध्वस्त
By Admin | Updated: July 5, 2014 00:42 IST2014-07-04T23:39:21+5:302014-07-05T00:42:30+5:30
भोकर : तालुक्यात अल्पश: पडलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या ७ हजार हेक्टरमधील पिके आता नेस्तनाबूत झाल्यात जमा आहेत़ यानंतर पाऊस झाला तरी या ७ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे़
पिके उद्ध्वस्त
भोकर : तालुक्यात अल्पश: पडलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या ७ हजार हेक्टरमधील पिके आता नेस्तनाबूत झाल्यात जमा आहेत़ यानंतर पाऊस झाला तरी या ७ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे़
भोकर तालुक्यात यावर्षी पावसाचा दमदारपणा दिसलाच नाही़ मध्यंतरी अल्पश: पसवसावर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली़ किनी, पाळज, आमठाणा, नेकली, नसलापूर, मोखंडी तांडा, देवठाणा, मसलगा, पाकी, धुळदेव, भुरभूशी, दिवशी खु़, गारगोटवाडी, रेणापूर, नांदा खु़, कोळगाव, कांडली, सोनारी, जामदरी, पिंपळढव, मातूळ, पोमनाळा, नागापूर, चिंचाळा, मोघाळी, हळदा या गावच्या शिवारातील ७ हजार हेक्टरमध्ये कापूस व सोयाबीनची पिके घेण्यात आली़ ही पिके काही प्रमाणात उगवली होती़ पण त्यानंतर पावसाची एकही सर न आल्याने या ७ हजार हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत झाली आहेत़ यानंतर पाऊस झाला तरी येथे दुबार पेरणी करावी लागणार आहे़ आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचा सामना करावा लागणार असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़
देव आठवला पण़़़
पाऊस पडावा म्हणून भोकर तालुक्यात आळंक्या, भंडारे, अन्नदान, पूजा-अर्चा करीत देवाची आठवण काढू लागले़ पण ना देव पावत आहे, ना पाऊस पडतो आहे़
सहा तलाव कोरडे
तालुक्यातील लामकाणी, इळेगाव, भुरभुशी, आमठाणा, किनी व कांडली येथील तलाव कोरडे पडले आहेत़ धानोरा तलावात ४२ टक्के तर सुधा प्रकल्पात २१ टक्के पाणीसाठा आहे़ जनावरांचा पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे़ (वार्ताहर)