शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:30 IST

जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतानाही महापालिकेकडे शहरात जास्त पाणी आणण्यासाठी यंत्रणा नाही. १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावरच भागत होती.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील सुमारे १४ वॉर्डांची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावर भागते. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भिजपावसामुळे तलावाची पाणीपातळी रविवारी सकाळी १६.५ फुटांपर्यंत पोहोचली. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे तलावात पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू असून, सोमवारी सकाळी पाणीपातळी १८ फुटांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मनपा अधिकाऱ्यांनी वर्तविला. तलावातून पाण्याचा उपसा वाढविण्यात आला. दररोज ७ एमएलडी पाणी घेण्यात येत आहे.

जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतानाही महापालिकेकडे शहरात जास्त पाणी आणण्यासाठी यंत्रणा नाही. १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावरच भागत होती. लोकसंख्या वाढू लागल्याने महापालिकेने १९७४ मध्ये ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकून जायकवाडीहून शहरात पाणी आणले. हर्सूल तलाव दरवर्षी भरतोच असे नाही. मागील वर्षीही परतीच्या पावसाने तलावात जेमतेम पाणी आले होते. आताही तलावात दोन दिवसांपासून पाण्याची आवक चांगली वाढली आहे. २४ तासांत अडीच ते तीन फुटांनी पाणीपातळी वाढत आहे. शनिवारी तलावाची पाणीपातळी साडेबारा फूट होती. सोमवारी सकाळी पाणीपातळी १६.५ फूट झाली. सोमवारी सकाळी १८ फुटांपर्यंत पाणी येईल, असे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.

७ एमएलडी पाण्याचा उपसामहापालिकेने मागील वर्षीच हर्सूल येथे ४ कोटी रुपये खर्च करून नवीन १० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले. तलावातील पाणीपातळी वाढू लागताच पाणीपुरवठा विभागाने उपसाक्षमताही वाढविली. दररोज ७ एमएलडी पाणी शुद्ध करून १४ वॉर्डांना दिले जात आहे. पुढील काही दिवसांत जुन्या शहराला एक दिवस अगोदर पाणी देण्यात येईल.

हर्सूल तलावाचा इतिहास१९५२ - तलावाचे बांधकाम पूर्ण१९८२- महापालिकेकडे हस्तांतरण१९३२- मीटर धरणाची लांबी१७.७० - मीटर महत्तम उंची१३७.५०- हेक्टर बुडीत क्षेत्र२१५- मीटर लांब सांडवा६.७९- दलघमी साठवण क्षमता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीhersul lakeहर्सूल तलाव