शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

हर्षकुमारने अटक अटळ दिसताच नातेवाइकांकडे लपवले सोन्याचे बिस्किट, मौल्यवान वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:50 IST

कारवाईच्या धास्तीने एक नातेवाईक दहा तोळ्याच्या बिस्किटासह अधिकाऱ्यांसमोर हजर; आत्तापर्यंत २२.५९ पैकी १५ कोटींची संपत्ती निष्पन्न

छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधीचा घोटाळा उघड झाल्यानंतर हर्षकुमार क्षीरसागरने शक्य तितके सोने, मौल्यवान वस्तू नातेवाइकांकडे लपविण्याचा प्रयत्न केला. हर्षकुमारचा हा बनाव लक्षात येताच एका नातेवाइकाने त्याच्याकडे दिलेले १० तोळ्यांचे २४ कॅरेट सोन्याचे बिस्कीट पोलिस अधिकाऱ्यांसमोर हजर होत सुपुर्द केले.

आपल्या कृत्याचा भंडाफोड होणार असे नोव्हेंबरअखेरीस हर्षकुमारला लक्षात आले होते. त्यानंतर आई-वडिलांचा तत्काळमध्ये पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न त्याने केला. हे करत असतानाच त्याने घोटाळ्याच्या रकमेमधून विकत घेतलेल्या मौल्यवान वस्तू व शक्य तितके सोन्याचे दागिने नातेवाइकांकडे ठेवण्यास दिले. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंत्राटी लिपिक असलेल्या अवघ्या २१ वर्षांच्या हर्षकुमारच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची देशभरात चर्चा झाली व त्यानंतर त्याच्या नातेवाईक, मित्रांना त्याच्या या कारनाम्याचा उलगडा झाला.

१० तोळ्यांचे बिस्कीट; आणखी असण्याची शक्यताहर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून सर्वाधिक पैसे सोन्यात गुंतवले आहेत. त्यापैकी काही दागिने आई, मैत्रिणीच्या नावे घेतले. बहुतांश सोने मुंबई, कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटमध्ये होते. परंतु, कॅनॉट प्लेसचा रूम पार्टनर ते घेऊन गेल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, हर्षकुमारने व्यवहार केलेल्या प्रत्येकाला अटक होत असल्याचे कळताच घाबरलेल्या एका नातेवाइकाने पोलिस अधिकाऱ्यांसमोर येत हर्षकुमारने त्याच्याकडे ठेवलेले १० तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट सुपुर्द केले.

आज पुन्हा पोलिस कोठडी वाढणार?हर्षकुमारसह त्याचे आई-वडील, मामाची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. दुपारी चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल. हर्षकुमारने प्राथमिक चौकशीत घोटाळ्याची कबुली दिली असली तरी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची व मालमत्तेची जप्ती बाकी आहे. त्यामुळे पोलिस त्याच्या आणखी पोलिस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

पंधरा कोटींपर्यंत संपत्ती सापडली२१.५९ कोटींपैकी जवळपास १५ कोटी रुपयांची मालमत्ता, सोन्याचे दागिने, कार, दुचाकी व अन्य मौल्यवान वस्तू शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यातील मोठी रक्कम त्याने परदेश वारीवर उडवली आहे. ट्रॅव्हल वेबसाइट व एजंटकडून पोलिस आता त्याची माहिती मागवत आहे. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी