हरीनाम सप्ताहाची झाली गिनीज बुकमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 18:34 IST2017-08-04T18:32:53+5:302017-08-04T18:34:13+5:30
एकाच ठिकाणी १० लाख भाविकांनी एकत्रित सत्संगात सहभागी होणे आणि त्यांना ८ मिनिटात प्रसादाच्या लाडूचे वाटप करणे असे दोन जागतिक विक्रम घडले.

हरीनाम सप्ताहाची झाली गिनीज बुकमध्ये नोंद
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ४ : गंगापूर तालुक्यातील आरापूर शिवारात सुरु असलेल्या योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या १७० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी एकाच ठिकाणी १० लाख भाविकांनी एकत्रित सत्संगात सहभागी होणे आणि त्यांना ८ मिनिटात प्रसादाच्या लाडूचे वाटप करणे असे दोन जागतिक विक्रम घडले.
या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना प्रदान करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी सोळंकी, सप्ताह समितीचे अध्यक्ष आ. प्रशांत बंब, खा. चंद्रकांत खैरे, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.