शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता विवाहितेचा परदेशात नेऊन पतीकडून छळ; सातारा ठाण्यात गुन्हा दाखल

By राम शिनगारे | Updated: October 6, 2022 19:15 IST

 वाहन खरेदीसाठी ७ लाख रुपयांची मागणी

औरंगाबाद : दोन वर्षांपुर्वी लग्न झालेल्या अभियंता विवाहितेचा परदेशात नेऊन पतीने छळ केला. त्यानंतर अचानकपणे मायदेशी परत आणून पासपोर्टसह इतर कागदपत्रे काढून घेतली. दसऱ्याच्या सणाला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून ७ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ती पूर्ण झाली नसल्यामुळे बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन नवऱ्यासह सात जणांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अभियंता असलेल्या विवाहितेचा ३ ऑगस्ट २०२० रोजी अमोल नामदेव आढावे (रा. सह्याद्रीनगर, सातारा परिसर) याच्यासोबत नोदंणी पद्धतीने विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्यांनी माहेरहुन घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी मागणी केली. मुलीला त्रास होऊ नये म्हणुन विवाहितेच्या वडिलांनी काही रक्कम दिली. त्यानंतरही मारहाणीसह मानसिक त्रास सुरुच राहिला. अमोल आढावे याला कंपनीमार्फत सिंगापुरला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने विवाहितेलाही नौकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडून सोबत नेले. त्याठिकाणीही अताेनात छळ सुरुच ठेवला. २८ सप्टेंबर रोजी अचानकपणे मायदेशी परत आणले. तसेच दसरा सणानिमित्त चारचाकी गाडी घ्यायची असल्यामुळे पैसे आणण्यासाठी दुसऱ्याच दिवशी माहेरला पाठवुन दिले. त्यानंतर चार दिवसांनी वडील विवाहितेला घेऊन सासरी गेले.

सासरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच अपमानित केले. त्यामुळे विवाहितेला सासरी सोडून वडील परत गेल्यानंतर नवरा अमोल याच्यासह सासरा नामदेव, दीर राहुल, नंदोई सिद्धार्थ जमधडे यांच्यासह सासु, जाऊ आणि नणंदेने बेदम मारहाण केली. ११२ वर मदतीसाठी संपर्क साधला असता मोबाईल काढून घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सातारा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सोडवणूक करीत ठाण्यात आणले. त्याठिकाणी मेडिकल मेमो देऊन आई-वडिलांच्या ताब्यात सोपविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद