पावसाच्या गीतांनी सखी चिंब
By Admin | Updated: July 27, 2016 00:46 IST2016-07-27T00:16:51+5:302016-07-27T00:46:23+5:30
औरंगाबाद : बाहेर पाऊसधारा आणि सिडको नाट्यगृहात ओसंडून वाहणारा उत्साह....प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष....युवती, महिला सारेच चिंब-चिंब..

पावसाच्या गीतांनी सखी चिंब
औरंगाबाद : बाहेर पाऊसधारा आणि सिडको नाट्यगृहात ओसंडून वाहणारा उत्साह....प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष....युवती, महिला सारेच चिंब-चिंब...२५ जुलै सोमवारचा अविस्मरणीय दिवस आणि रंगलेला गाण्याचा कार्यक्रम....निमित्त होते कलर्स प्रस्तुत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ कार्यक्रमाचे.
हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. प्रसिध्द गायकांच्या आवाजातील गाणी येथील उत्कृष्ट गायक कलावंतांनी सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे उद्घाटन अनघा काळे, रोहित महाजन आणि स्मिता सोनटक्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सूत्रसंचालन दिलीप खिस्ती यांनी केले.
प्रारंभ गौरव पवार यांच्या ‘सूर निरागस हो’ या गीताने झाला. त्यानंतर एकापेक्षा एक सुरेख गीते सादर करण्यात आली. प्रसिध्द गायक रवींद्र खोमणे यांनी ‘काळी माती निळ पाणी हिरवे शिवार’ व अनघा काळे यांनी ‘अजीर मन झाले’ हे गीत सादर करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. गौरव पवार यांनी ‘माऊली माऊली’ हे गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा घेतली. ‘झिंगाट’ या गाण्यावर सखींनी ताल धरला. अनघा काळे व गौरव पवार यांनी ‘सैराट झालं जी, याड लागलं, हिरवा निसर्ग हा मस्तीने’ ही बहारदार गीते सादर केली. गीतांना साथसंगत की-बोर्डवर राजू जगधणे, आॅक्टो-कार्डवर अमित निर्मळ, ढोलक-ढोलकीवर राजेंद्र वैराळ यांनी दिली. रोहित महाजन व स्मिता सोनटक्के यांचे नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विशेष सहकार्य लाभले. एकूणच या कार्यक्रमाने संगीतासोबत पावसाचा एक वेगळा रंग अनुभवता आला.
पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखला जा हॉट है सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिध्द मॉडेल- नायिका जॅकलीन फर्नांडिस सेलिब्रेटी जज आहे. याशिवाय सुप्रसिध्द फिल्म दिग्दर्शक करण जोहर, सुप्रसिध्द कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुध्दा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहेत.
एकूण १२ सेलीब्रेटी या झलक दिखला जा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहेत. ज्यात सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिध्दांत गुप्ता आणि शांतनू माहेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलीब्रेटी या शो चे आकर्षण आहे. पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शो ला एक ग्लॅमरस आणि सिझलिंग स्वरूप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट्य आहे.