एटीएममध्ये ठणठणाट
By Admin | Updated: October 3, 2014 00:37 IST2014-10-02T23:59:34+5:302014-10-03T00:37:55+5:30
औरंगाबाद : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती व दसरा आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग दोन सुट्या मिळणार आहेत.

एटीएममध्ये ठणठणाट
औरंगाबाद : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती व दसरा आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग दोन सुट्या मिळणार आहेत. सुट्या आणि सण आल्यामुळे शहरातील बँकांमध्ये बुधवारी दिवसभर गर्दी दिसून आली. दिवसभरात नियमित व्यवहारांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचे
बँकांच्या अधिकाऱ्यांनी
सांगितले; परंतु दसऱ्याच्या दिवशीच एटीएममध्ये ठणठणाट होण्याची शक्यता आहे.
सलग सुट्यांमुळे अनेक शासकीय कर्मचारी शनिवारची रजा घेऊन रविवारच्या सुटीसह चार दिवसांच्या सुटीचा आनंद घेण्याचे नियोजन
करीत होते. या नियोजनानुसार
अनेक कर्मचाऱ्यांनी बुधवारीच
बँक व एटीएममधून पैसे काढले होते. यामुळे बँकांच्या व्यवहारात वाढ झाली.
सलग सुट्या असल्यामुळे बँकांकडून एटीएममध्ये पैसे भरण्यात आले; परंतु सण असल्यामुळे शनिवारपर्यंत पुरतील का, असा प्रश्न उभा आहे.
दसऱ्याच्या दिवशी अनेक जण नवीन वाहन, घर इतर वस्तू खरेदी करतात. यामुळे सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. एक आॅक्टोबर रोजी बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार बँकांमध्ये जमा झाले आहेत. खात्यावर पैसे असल्यामुळे काढण्याचे प्रमाण अधिक असते.
शनिवारी बँकांचे
व्यवहार सुरू
सलग सुट्या असल्या तरी बुधवारी सर्व एटीएममध्ये पैसे भरण्यात आले आहेत. त्यामुळे जास्त परिणाम होणार नाही. शनिवारी बँकांचे व्यवहार नियमितपणे सुरू राहतील, असे स्टेट बँक आॅफ हैदराबादचे प्रमोद बेंडे यांनी सांगितले.
दसऱ्याच्या दिवशी अडचण होऊ शकते
ग्राहकांची गुरुवारी अडचण झाली नाही; पण शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी अडचण होऊ शकते. शनिवारी पुन्हा व्यवहार नियमित होईल, अशी माहिती बँक आॅफ महाराष्ट्रचे देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.