आठवडी बाजारातील मोबाईलचोर पकडले

By Admin | Updated: June 19, 2017 00:16 IST2017-06-19T00:12:48+5:302017-06-19T00:16:08+5:30

जालना : आठवडी बाजारातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Handsome mobile market caught on weekdays | आठवडी बाजारातील मोबाईलचोर पकडले

आठवडी बाजारातील मोबाईलचोर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आठवडी बाजारातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रेल्वेस्टेशन रस्त्यावरील आठवडी बाजारात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची सुनील पांडुरंग विटकर (२५, रा.तिसगाव, औरंगाबाद) व अविनाश बाबूराव यादव (२०, रा.गजानननगर, बीड) अशी नावे आहेत. काही दिवसांपासून शहरातील रेल्वेस्थानक व लालबाग परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढत आहेत. रविवारी काही संशयित मोबाइल चोरण्याच्या उद्देशाने स्टेशन रोडवरील बाजारात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी पथकातील व्ही.एम. गडदे, हिरामण फलटणकर, चौधरी यांना बाजारात गस्तीवर पाठवले. पथकातील कर्मचाऱ्यांनी बाजारात एका व्यक्तीचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरील दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त केले.
या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांकडून मोबाईल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Handsome mobile market caught on weekdays