कानावर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:02 IST2021-04-04T04:02:57+5:302021-04-04T04:02:57+5:30
औरंगाबाद ते पैठण एसटी बस बिडकीनजवळ पोहोचली होती. तेवढ्यात पाठीमागून एक वाहन आले व त्या बसला थांबविले. तिकीट तपासणी ...

कानावर हात
औरंगाबाद ते पैठण एसटी बस बिडकीनजवळ पोहोचली होती. तेवढ्यात पाठीमागून एक वाहन आले व त्या बसला थांबविले. तिकीट तपासणी पथकातील अधिकारी प्रत्येक प्रवाशाचे तिकीट तपासत होते. एक प्रवासी झोपलेला होता. त्यास अधिकाऱ्यांनी उठवले व तिकीट मागितले. त्यांनी खिशात हात घातला. त्यास तिकीट भेटले नाही. तो म्हणाला की, साहेब मी खूप प्रामाणिक आहे, नेहमी तिकीट काढतो, पण आज बसमध्ये बसलो आणि झोप लागली. मी तिकीट काढण्याचे विसरलो. अधिकाऱ्यांनी त्यास तिकिटाची रक्कम व वर दंड लावला. तो प्रवासी दंड भरण्यास तयार नव्हता. रागाच्या भरात तो म्हणाला की, मी किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला माहीत नाही, लावतो आमदाराला फोन. तेच मी किती प्रामाणिक आहे ते तुम्हाला सांगतील. त्याने फोन लावला, पण सतत व्यस्त येत होता. तो प्रवासी म्हणाला, मायला हे लोकप्रतिनिधी कधीच वेळेवर कामाला येत नाहीत. त्यावेळेस तो अधिकारी म्हणाला, फोन करण्यापेक्षा आता दंड भरा व तुमचा प्रामाणिकपणा सर्वांना दाखवा, असे म्हणताच त्या बसमध्ये एकच हंशा पिकला.