कॅन्सरपीडित विद्यार्थ्याला हवा मदतीचा हात
By Admin | Updated: January 9, 2017 23:30 IST2017-01-09T23:27:53+5:302017-01-09T23:30:27+5:30
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ब्लड कॅन्सर झाला आहे़

कॅन्सरपीडित विद्यार्थ्याला हवा मदतीचा हात
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ब्लड कॅन्सर झाला आहे़ घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे कुटुंबीयांना त्याच्यावर उपचार करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन त्याच्या नातेवाईकांनी केले आहे़
मोहगाव येथील सुदर्शन सुग्रीव सिरसाट (१९) हा युवक सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील बीएससी नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे़ नेहमीच आजारी पडत असल्याने त्याची रूग्णालयात तपासणी करण्यात आली असता त्याला ब्लड कॅन्सर झाल्याचा अहवाल आला आहे़ उपचारासाठी लागणारा खर्च पेलवणारा नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ सध्या त्याच्यावर पुणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून दर आठवड्याला त्याला २० हजारांचा खर्च येत आहे़ सलग तीन वर्षे अशा पध्दतीने उपचार घ्यावयाचे असून याचा खर्च सात ते आठ लाख रूपयांचा आहे़ समाजातील दानशूर व्यक्तींनी सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल (खाते नं़ ३७०००१००६११९३, आयएफएससी- यूबीआयएन (०५३७००४) वर दान द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे़