नगर परिषदेकडून अपंगांचे सर्व्हेक्षण
By Admin | Updated: March 27, 2016 00:09 IST2016-03-27T00:09:05+5:302016-03-27T00:09:05+5:30
जालना : जालना नगर परिषदेच्या वतीने शहरातील अपंगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना माहिती संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नगर परिषदेकडून अपंगांचे सर्व्हेक्षण
जालना : जालना नगर परिषदेच्या वतीने शहरातील अपंगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना माहिती संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत अपंगांच्या योजनांसाठी आलेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जालना नगर परिषदेकडे शहरातील अपंगांची निश्चित आकडेवारी व माहिती उपलब्ध नसल्यामुळे सदर योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यानुषंगाने पालिकेने जालना शहरातील अपंगांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे. आशा कर्मचाऱ्यांवर सर्व्हेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तसेच जालना नगर परिषदेच्या पाणीवेस भागातील दवाखान्यात देखील अंपंगांची माहिती स्वीकारली जाणार आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थसंकल्पातील काही निधी अपंगांच्या कल्याणार्थ खर्च करावा लागतो. हा निधी योग्य तऱ्हेने खर्च करण्यास येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे.
जालना शहरातील अपंगांनी आपापली माहिती आशा कर्मचारी किंवा नगर परिषदेच्या पाणीवेसस्थित दवाखान्यात नोंदवावी, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी केले आहे.