‘सिव्हिल’च्या संरक्षक भिंतीवर पडणार हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:04 IST2021-02-11T04:04:51+5:302021-02-11T04:04:51+5:30
सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचे आधारवड म्हणून ओळख असलेल्या घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा मोठा ताण आहे. हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने ...

‘सिव्हिल’च्या संरक्षक भिंतीवर पडणार हातोडा
सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचे आधारवड म्हणून ओळख असलेल्या घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा मोठा ताण आहे. हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने चिकलठाणा येथे २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली. या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन रुग्णसेवेलाही प्रारंभ झाला. गेली अनेक महिने जालना रोडच्या रुंदीकरणामुळे रुग्णालयाच्या इमारतीचा काही भाग जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, इमारतीच्या मुख्य इमारतीच्या भागाला रुंदीकरणाचा कोणताही फटका बसणार नाही. परंतु, संरक्षक भिंत पाडावी लागणार आहे. रुग्णालयाची नवीन संरक्षक भिंत आता रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळपर्यंत करावी लागणार आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या समोरील भागात वाहने उभी करता येणार नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, संरक्षक भिंत पाडण्यात येणार आहे. नवीन संरक्षक भिंत काहीशी अलीकडे बांधण्यात येईल. रुग्णालयाच्या पाठीमागील भागातून ये-जा करण्यास प्राधान्य दिले जाईल.