शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:25 IST

''आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.''

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी बसस्टॉप परिसरात गेल्या ५५ वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. मनपाच्या पथकाने १०० मीटरपेक्षा अधिक आत घुसून दुकाने, व्यावसायिक जागा जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले असून, त्यांच्या पोटावर लाथ मारली आहे, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या.

या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसीची हद्द होती, तत्कालीन आमदार डॉ. कल्याण काळे आणि तत्कालीन उद्योगमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे प्लॉट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सत्ता परिवर्तनामुळे हा निर्णय अंमलात आला नाही. यानंतर देखील स्थानिक नागरिकांनी सिडकोकडे पैसे भरून नियमितपणे जागा मिळावी, यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि शुक्रवारी अचानकपणे मनपाने अतिक्रमणाच्या नावाखाली ही कारवाई केली.

माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे आणि भाऊसाहेब जगताप यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मनपाची ही कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप केला. आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.

विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या कारवाईत भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. सत्तेचा वापर करून गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे. भाजप आमदारांनी मुकुंदवाडीतील स्थानिक लोकांना त्यांच्या व्यवसायातून हुसकावून लावले, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला.

या अन्यायाच्या विरोधात आता व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. शनिवारी (२१ जून) मुकुंदवाडी परिसरातील व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटना यांनी अतिक्रमणविरोधी अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

अंगावर रॉकेल घेत अतिक्रमणाला विरोधअतिक्रमणविरोधी पथकाने संजयनगर गल्ली नं.१ मध्ये राजेश पवार यांचे घर पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा राजेशने पथकाला अडविण्याचे खूप प्रयत्न केले; पण पथकातील कर्मचारी ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते.माझे अख्खे कुटुंब उघड्यावर आणून तुम्हाला काय साध्य करायचे आहे. नोटीस दाखवा, मगच घराला हात लावा. २० वर्षांपासून आम्ही कर भरतो. आमचे घर आताच कसे अतिक्रमणात आले, असे प्रश्न करीत शेवटी राजेशने रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

कोट्यवधींचे नुकसानशुक्रवारी २२९ अतिक्रमणे पाडण्यात आली. यातील बहुतांश दुकानांमधील सामानही व्यापाऱ्यांना काढता आले नाही. त्यामुळे किमान ८ ते १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज या भागातील व्यापाऱ्यांनी वर्तविला. सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

दुचाकी वाहने जप्तमुकुंदवाडी स्मशानभूमीला लागून एक जुन्या दुचाकी विक्रीचे दुकान होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एका मोठ्या वाहनात सर्व दुचाकी भरून गरवारे स्टेडियम येथे नेल्या. त्यानंतर त्यांचे शेड जमीनदोस्त केले.

बेघर करण्याच्या आदेशाने मन हेलावलेया घरात आम्ही उद्याचे स्वप्न बघितले होते, पण आता आमच्या डोक्यावरचे छप्पर हिरावले जातेय, या शब्दांत संजयनगर गल्ली नंबर १ मधील रहिवासी आकाश गतखणे यांनी मनपाच्या कारवाईविरोधात आपल्या व्यथा मांडल्या. गतखणे कुटुंब गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या परिसरात राहत असून, त्यांनी आपल्या राहत्या घरातच वॉशिंग

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर