उमरग्यात अतिक्रमणावर हातोडा

By Admin | Updated: November 17, 2015 00:29 IST2015-11-17T00:05:42+5:302015-11-17T00:29:16+5:30

उमरगा : शहरातील पतंगे रोडलगत झालेल्या अतिक्रमणावर सोमवारी पुन्हा एकदा पालिकेने कारवाई करीत जवळपास १५० दुकाने काढली़ पालिकेच्या या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे

Hammer at encroachment in Umarga | उमरग्यात अतिक्रमणावर हातोडा

उमरग्यात अतिक्रमणावर हातोडा


उमरगा : शहरातील पतंगे रोडलगत झालेल्या अतिक्रमणावर सोमवारी पुन्हा एकदा पालिकेने कारवाई करीत जवळपास १५० दुकाने काढली़ पालिकेच्या या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने संपूर्ण अतिक्रमणे पुन्हा एकदा हटविण्यात आली आहेत़
उमरगा शहरातील पतंगे रोडलगत असलेल्या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते़ पालिकेने सन २०१२ मध्ये ही दुकाने अतिक्रमण करून थाटण्यात आल्याचे कारण पुढे करीत नोटीसा बजावल्या होत्या़ त्यावेळी या दुकानदारांनी न्यायालयात धाव घेवून आपली बाजू मांडली होती़ तद्नंतर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी अतिक्रमणधारकांना पालिका गाळे बांधून देईल, असे आश्वासन दिले होते़ मात्र, मागील तीन वर्षात पालिकेकडून एकही गाळा बांधण्यात न आल्याने अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांनी रविवारी अचानक आपापल्या पूर्वीच्या जागेवर शेड मारण्यास सुरूवात केली होती़ यावेळी विविध राजकीय पक्षाचे पुढारीही उपस्थित होते़ अचानक पुन्हा एकदा अतिक्रमणे होवू लागल्याने पालिका कोणती भूमिका घेणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते़ मात्र, सोमवारी सकाळीच मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी पोलीस बंदोबस्तात पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली़ यावेळी काही व्यवसायिकांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता़ मात्र, बंदोबस्तावरील पोलीस व मुख्याधिकारी यांनी कडक भूमिका घेत अतिक्रमण हटविले. यावेळी पोनि रांजणकर, पोउपनि मनोजकुमार लोंढे, कासले यांच्यासह पोलीस कर्मचारी, पालिकेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़

Web Title: Hammer at encroachment in Umarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.