इतवारा भागात मनपाचा अतिक्रमणावर हातोडा
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:47:16+5:302014-08-17T00:54:57+5:30
नांदेड : इतवारा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात केलेले अतिक्रमण शनिवारी महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने पाडले़

इतवारा भागात मनपाचा अतिक्रमणावर हातोडा
नांदेड : इतवारा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात रस्ता रूंदीकरणासाठी भूसंपादित केलेल्या जागेवर तीन व्यक्तींनी केलेले व अडथळा ठरणारे अतिक्रमण शनिवारी महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने पाडले़
सावरीकर दवाखाना ते पहेलवान टी हाऊस या दरम्यान रस्ता क्रमांक ८ वरील फतेजंग खॉ मशिद समोरील रस्ता रूंदीकरणासाठी भूसंपादित केलेल्या जागेवर गौसोद्दीन सरवरोद्दीन, वहिदुनिसा बेगम महमद युसुफोद्दीन आणि म़ अथरोद्दीन म़ युसुफोद्दीन या तिघांनी प्रत्येकी २४ चौरस फूट या प्रमाणे रस्त्याला लागून तीन फूट रूंदीच्या शटरचे अतिक्रमण केलेले होते़ संबंधितांना वारंवार सूचना दिल्यानंतरही त्यांनी आपले अतिक्रमण काढून घेतले नाही़ या परिसरात उदभवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शनिवारी हे अतिक्रमण काढण्यात आले़
शहरातील प्रमुख रस्त्यावर फेरीवाले, हातगाडेवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ कलामंदिर, वजिराबाद, शिवाजीनगर, वर्कशॉप, तरोडानाका, भावसारचौक, श्रीनगर आदी भागात किरकोळ व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटले आहेत़़ महापालिकेने हे अतिक्रमण काढून वाहतुक समस्या मार्गी लावावी़ (प्रतिनिधी)