अतिक्रमणावर हातोडा
By Admin | Updated: March 10, 2017 00:30 IST2017-03-10T00:28:31+5:302017-03-10T00:30:18+5:30
उस्मानाबाद : शहरातील दत्तनगर भागातील गट क्रमांक १९ मधील ओपनस्पेसवर झालेल्या अतिक्रमणावर बुधवारी पालिकेने हातोडा मारला़

अतिक्रमणावर हातोडा
उस्मानाबाद : शहरातील दत्तनगर भागातील गट क्रमांक १९ मधील ओपनस्पेसवर झालेल्या अतिक्रमणावर बुधवारी पालिकेने हातोडा मारला़
शहरातील दत्तनगर भागाला लागून असलेल्या पालिकेच्या ओपन स्पेसवर अतिक्रमण झाले होते़ याबाबत पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती़ पालिकेने नोटीस देऊनही अतिक्रमण हटविण्यात येत नसल्याने ३ जानेवारी रोजी पालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तासह हटविण्यास गेले होते़ त्यावेळी तीन दिवसांची मुदत मागितल्यानंतर कारवाई करण्यात आली नव्हती़ त्यानंतर संबंधितांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती़ मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती़ त्यानंतर पालिकेने अतिक्रमण हटविण्यास सांगून ८ मार्च रोजी कारवाई करून अतिक्रमण हटविले़ पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली़ यावेळी पथक प्रमुख सुनिल कांबळे, गोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते़ आनंद नगर ठाण्याचे सपोनि शिंदे यांनी यावेळी बंदोबस्त तैनात केला होता.(प्रतिनिधी)