मंठ्यात १२५ अतिक्रमणांवर हातोडा
By Admin | Updated: July 9, 2017 00:33 IST2017-07-09T00:31:58+5:302017-07-09T00:33:47+5:30
मंठा : शहरातील मुख्य मार्गावर नगरपंचायतीने शनिवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून १२५ अतिक्रमण हटविले.

मंठ्यात १२५ अतिक्रमणांवर हातोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : शहरातील मुख्य मार्गावर नगरपंचायतीने शनिवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून १२५ अतिक्रमण हटविले.
शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानासमोर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगराध्यक्षा पार्वती बोराडे, उपनराध्यक्ष बाळासाहेब बोराडे आणि मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले. मात्र, याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नगरपंचायतीच्या वतीने शनिवारी धडक मोही राबविण्यात आली. यामध्ये १२५ दुकानांसमोरील दुकानासमोरील अतिक्रमण हटविले. शहरातील अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमणही काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी कानपुडे यांनी स्पष्ट केले.