शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा उभारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 18:58 IST

काकासाहेब शिंदे यांच्या पहिला स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

ठळक मुद्देकायगाव येथील नदीवरील पुलावर अर्धाकृती पुतळा उभारला.या पुलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू असे नामकरण करण्यात आले होते. 

कायगाव (जि. औरंगाबाद)  : मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा सोमवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी गोदावरीच्या पुलावर उभारला. मंगळवारी (दि. २३) काकासाहेब शिंदे यांचा पहिला स्मृतिदिन असल्याने विविध कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले आहेत. 

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या वर्षी आजच्या दिवशी जुने कायगाव येथील गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा वतीने देण्यात आला होता.  त्यानुसार २३ जुलै २०१८ रोजी काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पुलाच्या मध्यभागी येऊन गोदावरी नदीत उडी घेतली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्षे पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जुने कायगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी सोमवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गातील नदीवरील पुलावर काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. विटा-सिमेंटचा चबुतरा तयार करून त्यावर पुतळा बसविण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या आंदोलन दरम्यान या पुलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू असे नामकरण करण्यात आले होते. 

आजच्या नियोजित कार्यक्रमामूळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक बिडकीन- पैठण मार्गे वळविण्यात आली आहे. परजिल्हातून येणाऱ्या जड वाहतूकदारांना पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याचे माहिती नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जडवाहतुक औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर भेंडाळा फाटा येथे थांबविण्यात आली होती. पोलिसांनी तेथेच बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. 

जुने कायगावला पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. दंगा काबू पथकाच्या तीन गाड्या, १ वरुन वॉटर पॅनल, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, १३ उपनिरीक्षक, आणि सुमारे २५० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, तसेच अग्निशमनचे वाहन आणि पंधरा जणांचे पथक, नदीच्या पात्रात एक बोट अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करून ठेवण्यात आली आहे

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा