मंजूर पदांपैकी निम्मेच पोलीस कर्मचारी

By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-27T23:38:38+5:302014-11-28T01:12:25+5:30

परळी : १९ वर्षांपूर्वी परळी शहर ठाण्याला १२६ पदे मंजूर झाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून सद्यस्थितीला केवळ ५७ पोलीस कर्मचारीच कार्यरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

Half of the sanctioned posts are police personnel | मंजूर पदांपैकी निम्मेच पोलीस कर्मचारी

मंजूर पदांपैकी निम्मेच पोलीस कर्मचारी



परळी : १९ वर्षांपूर्वी परळी शहर ठाण्याला १२६ पदे मंजूर झाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून सद्यस्थितीला केवळ ५७ पोलीस कर्मचारीच कार्यरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
शहराची लोकसंख्या वाढत असल्या कारणाने परळी शहर पोलीस ठाण्याला १२६ पदे मंजूर करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने सर्वाधिक पदे या ठाण्याला मंजूर करण्यात आली होती. मात्र वर्षागणिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. परळी शहर ठाण्यात केवळ ८६ पोलीस कर्मचारी आहेत. त्यापैकी .एसडीपीओ अंबाजोगाई ४, पोलीस मुख्यालय बीड २ व तालुका डीएसबी एक असे ७ पोलीस कर्मचारी ड्युटीसाठी कायम बाहेरगावी असतात. तर साप्ताहिक सुट्टी, किरकोळ रजा घेणाऱ्यांची संख्या २२ आहे. उरलेले ५७ पोलीस कर्मचारी दररोज वेगवेगळी कामे करतात. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यास दिवसाआड रात्रपाळी करावी लागते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, परळी शहर पोलीस ठाण्याला मंजूर पदापेक्षाही जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही आपण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष व भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी सांगितले. (वार्ताहर)ु
जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यातील पोलीस कर्मचारी घेऊन दरोडा प्रतिबंधक पथक, दंगल विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. ज्या ठाण्यांना जेवढ्या पोलिसांची गरज आहे तेवढे कर्मचारी देण्यात आलेले आहेत. गरज भासल्यास पोलीस कर्मचारी देण्यात येतात, असे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.

Web Title: Half of the sanctioned posts are police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.