शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा पावसाळा संपला, तरी प्रतीक्षा

By admin | Updated: August 8, 2016 00:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यावरही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी २३ टक्के आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. मराठवाड्यातील सुमारे ७५ टक्के लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही जोत्याच्याच जवळपास आहे.मराठवाड्यातील पाणीसाठा यंदा पूर्णपणे संपला होता. त्यामुळे एप्रिलपासूनच मराठवाड्यातील हजारो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विभागातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. विभागातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आठवडाभरात तब्बल ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे; परंतु असे असले तरी आतापर्यंत झालेला पाऊस पाहता उर्वरित धरणांमध्ये पुरेसे पाणी आलेले नाही. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. परंतु आतापर्यंत धरणांमध्ये पन्नास टक्केही साठा झालेला नाही.मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी १७ टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे. वरीलपैकी तब्बल ४९६ सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यात मात्र ८० पैकी ४९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांच्या परिस्थितीतही फारशी सुधारणा झालेली नाही. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दहा प्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होऊ शकला आहे. या दहा प्रकल्पांत नांदेड जिल्ह्यातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.