पंधरा दिवसांत दीड कोटींचा पीकविमा
By Admin | Updated: August 7, 2014 01:46 IST2014-08-07T00:45:53+5:302014-08-07T01:46:19+5:30
शिरूरकासार : येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसात दीड कोटींचा पीक विमा भरणा केला आहे.

पंधरा दिवसांत दीड कोटींचा पीकविमा
शिरूरकासार : येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसात दीड कोटींचा पीक विमा भरणा केला आहे. अजुनही काही पीक विमा भरण्यासाठी बॅँकेत गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहेत.
गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांवर अनेक अडचणी येत आहेत. कधी दुष्काळ तर कधी गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती येत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरवला गेला आहे. तसेच यामध्ये भाजीपाला, फळबागांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये भरपाई मिळाली होती. यावर्षीही अद्याप पुरेसा पाऊस नाही. मात्र, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणीसह इतर कामांवर खर्च केला आहे. त्यामुळे यावर्षीही नैसर्गिक आपत्तीने अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शेतकरी बॅँकेत पीक विमा भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे येथे दिसून येत आहे.
कापूस, ऊस, तूर, मूग, भुईमूग, बाजरी आदी पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला आहे. शिरूरसह रायमोहा, तिंतरवणी, खालापुरी येथील डीसीसीच्या शाखेतही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. शिरूर शाखेत दीड कोटी तर इतर शाखेतू मिळून शेतकऱ्यांनी तीन कोटींचा पीक विमा भरल्याचे येथील शाखेतून सांगण्यात आले.
पीक विमा भरण्याची शेवटची तारीख १६ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बॅँकेत अजुनही गर्दी दिसून येत आहे. (वार्ताहर)