मजुरांना रोजगार हमीचे अर्धेच पैसे दिले

By Admin | Updated: July 25, 2016 00:35 IST2016-07-25T00:15:19+5:302016-07-25T00:35:09+5:30

परतूर: रोजगार हमी योजनेवरील मजुरांना केलेल्या कामाचे अर्धेच पैसे देण्यात आले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

Half of the job guarantee for the laborers was given to the workers | मजुरांना रोजगार हमीचे अर्धेच पैसे दिले

मजुरांना रोजगार हमीचे अर्धेच पैसे दिले


परतूर: रोजगार हमी योजनेवरील मजुरांना केलेल्या कामाचे अर्धेच पैसे देण्यात आले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. विचारणा केली असता कामावरील अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवक हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
परतूर तालुक्यात उन्हाळ्यात शासनाने रोजगार हमीची कामे केली. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी बराच गोंधळ केला आहे. प्रत्यक्ष काम केलेल्या मजुरांचे पूर्ण देयक न काढता अपात्र लाभार्थ्यांना, वयस्कर व सालगड्यांना तसेच पुढारपण करणाऱ्यांची या योजेनेत नावे घुसडण्यात आली आहेत. या लोकांनी कामे न करताच यांच्या नावावर बँकेत पैसे संबंधित अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्या संगनमताने जमा करण्यात आले आहेत. खरे काम करणारे मजूर वंचित ठेवून बोगस मजुरांना लाभ देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून आमचे कामाचे पैसे द्यावेत, अशीही
मागणी वलखेड येथील मजुरांनी
केली आहे. दरम्यान या प्रकाराची तक्रार पालकमंत्री बबनराव
लोणीकर यांच्याकडेही करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Half of the job guarantee for the laborers was given to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.