आवक निम्म्यावर!
By Admin | Updated: December 18, 2014 00:37 IST2014-12-18T00:29:21+5:302014-12-18T00:37:10+5:30
रमेश शिंदे , औसा तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेती उत्पादनाला मोठा फटका बसला आहे़ त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे़

आवक निम्म्यावर!
रमेश शिंदे , औसा
तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेती उत्पादनाला मोठा फटका बसला आहे़ त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे़ येथील बाजार समितीत आवक निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे़
मागील काही वर्षांपासून औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक चांगल्या प्रकारे होत होती़ शेती मालाला लातूरच्या बाजार समितीप्रमाणे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा येथील बाजार समितीवर विश्वास वाढला़ परिणामी, येथील बाजार समितीत आडत दुकानांची संख्याही वाढली़ त्यामुळे येथील बाजार समितीमध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली़ परंतु, यंदा पावसाअभावी शेतीचे अर्थशास्त्रच कोलमडले आहे़ मागील वर्षीच्या तुलनेत यंदा येथील बाजार समितीत शेती मालाची आवक ही ५० टक्क्यांच्या आतच होत आहे़
तालुक्यात यंदा ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती़ पण उत्पादनात मोठी घट झाल्याचे बाजार समितीतील आवक पाहता लक्षात येते़ मागील वर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांत ८३ हजार ६०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती़ पण यंदाच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये ५६ हजार २५३ क्विंटल इतकीच आवक झाली आहे़ मागील वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनची पेरणी अधिक झाली होती़ त्याचबरोबर हायब्रीड, मुग, उडीद यासह अन्य शेतीमालांची स्थिती अशीच आहे़ एकूणच उत्पादनामध्ये ५० टक्के पेक्षा अधिक घट झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच बाजार समितीलाही या दुष्काळाचा मोठा आर्थिक फटका बसत आहे़ ४
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव शाम कुलकर्णी म्हणाले की, या वर्षी शेतीमालच पिकला नाही तर बाजारपेठेत कुठून येणाऱ बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने आमच्या उत्पन्नावर त्यांचा निश्चित परिणाम होणार आहे़
४आडद दुकानदार बालाजी यादव म्हणाले की, यावर्षी आवक फारच कमी असल्याने व्यवसायाला फटका बसत आहे़