शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

ऑगस्टची सुरुवात कोरडी; मराठवाड्यातील धरणांत फक्त ४७ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 12:23 IST

Rain in Marathwada : नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे.

ठळक मुद्देविभागातील सर्व ८७९ प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.८ हजार १९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या प्रकल्पांत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात ८७९ प्रकल्पांत फक्त ४७ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ५३ टक्के पाणी असून, सर्व धरणांची तहान वाढू लागली आहे. त्यातल्या त्यात ऑगस्ट महिना आतापर्यंत कोरडाठाक आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचे पुनरागमन होईल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदावरी नदी पात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे निसर्गाचा असमतोल यंदाच्या पावसाळ्यात दिसतो आहे. विभागातील सर्व ८७९ प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. ८ हजार १९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या प्रकल्पांत आहे. मोठ्या प्रकल्पांत क्षमतेच्या तुलनेत ५३ टक्केच जलसाठा असल्यामुळे विभागाची चिंता वाढली आहे. पावसाळ्याचे फक्त ४८ दिवस उरले आहेत. आता परतीच्या पावसावरच सगळी मदार असल्याचे बोलले जात आहे.

५६०० दलघमी पाणीसाठ्याची तूट११ मोठ्या प्रकल्पांत २ हजार ७९८ दलघमी उपयुक्त साठा आहे. मागच्या वर्षी ३०२० दलघमी पाणी मोठ्या प्रकल्पांत होते. सुमारे १२०० दलघमीची तूट मोठ्या प्रकल्पात आहे. ५६०० दलघमी पाण्याची तूट सर्व ८७९ प्रकल्पांत आहे. या प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी पाणीसाठा सध्या आहे. मोठ्या ११ प्रकल्पांवरच विभागातील ६० टक्के भूभागाची तहान भागते. त्यामुळे या प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विभागातील आठही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजवर ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. चार मोठ्या प्रकल्पात ६० टक्क्यांच्या पुढे जलसाठा आहे. जायकवाडीत फक्त ४० टक्के साठा आहे.

मराठवाड्यातील जलसंपदा अशीप्रकल्प             संख्या जलसाठामोठे प्रकल्प            ११ ५३ टक्केमध्यम प्रकल्प ७५ ३९ टक्केलघू प्रकल्प ७५३ ३१ टक्केगोदावरीनदी बंधारे १५ ५० टक्केतेरणा व बंधारे २५ ४८ टक्केएकूण             ८७९             ४७ टक्के

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाRainपाऊस