हज हाऊसचे काम निकृष्ट !

By Admin | Updated: May 1, 2015 00:51 IST2015-05-01T00:37:36+5:302015-05-01T00:51:37+5:30

बीड : शहरातील किल्ला मैदान भागातील जामा मस्जिदीच्या शेजारी असलेल्या हज हाऊसच्या बांधकाामसाठी एका कंस्ट्रक्शन कंपनीने २५ लाख तर अल्पसंख्यांक फंडातून

Haj's work is dismal! | हज हाऊसचे काम निकृष्ट !

हज हाऊसचे काम निकृष्ट !


बीड : शहरातील किल्ला मैदान भागातील जामा मस्जिदीच्या शेजारी असलेल्या हज हाऊसच्या बांधकाामसाठी एका कंस्ट्रक्शन कंपनीने २५ लाख तर अल्पसंख्यांक फंडातून ८९ लाख रूपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र येथे अनेक असुविधा असल्याचा आरोप अब्दुल खालेक पेंटर व समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुसा खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
शहरातील किल्ला मैदान परिसरात जामा मस्जिदलगत हज हाऊससाठी तळमजल्यात एक इमारत तयार करण्यात आलेली आहे. या इमारतीचे पूर्ण खोदकाम, आरसीसीचे कॉलम, चारही बाजुच्या भिंती व बेसमेंटचे काम आधी जामा मस्जिद कमिटीने स्वखर्चाने तयार केलेले असल्याचा उल्लेख खालेक पेंटर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केलेला आहे. पुढे म्हटले आहे की, सन २०१४ मध्ये हज हाऊसची निविदा काढण्यात आली. सदरील कामाचे कंत्राट एका कंस्ट्रक्शनला देऊन काम करण्यात आले.
उद्घाटनावेळी हज हाऊसच्या इमारतीच्या नियोजित प्लॅनमध्ये सदरील इमारत दोन मजली दाखवली असुन कामासाठीचा निधी २५ लाख दाखविण्यात आला आहे. अंडर ग्राऊंड खोदकाम व बेसमेंटच्या कॉलमचे काम मस्जिद कमिटीने केले आहे. ठेकेदाराने हेच काम पूर्ण केले आणि केवळ अंडर ग्राऊंडचे काम करुन बील उचलले आहे. हे सर्व काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही खालेक पेंटर यांनी केला आहे.
अल्पसंख्यांक फंडाचाही
पैसा वापरला
सन २०१३-१४ मध्ये अल्पसंख्यांक विभागामार्फत याच हज हाऊस बांधकामासाठी एका कंत्राटदाराने ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी उचलला असल्याचा आरोप मुसा खान यांनी केला आहे. सदरील कामाचे ‘वर्क डन’ असा उल्लेख नगर परिषदेला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात करण्यात आला असल्याचे खान म्हणाले.
त्या कंस्ट्रक्शनला आमदार फंडातील २५ लाख रुपये तर अल्पसंख्यांक फंडातून ८९ लाख ५ हजार रुपये बांधकामासाठी वापरले असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, हज हाऊसमध्ये यात्रेकरुसाठी कोणत्या सुविधा नसून केवळ एक हॉल तयार करुन कामाला अंतिम स्वरुप दिले असल्याचा आरोप मुसा खान यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, औद्यागिक नगर अधिनियम १९६५ चे कलम ३१३ प्रमाणे बीड नगर परिषद बरखास्त करण्याची शासनास शिफारस करण्याची मागणी खालेक पेंटर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
४त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांच्यामार्फत प्राथमिक अहवाल मागविला होता.
४त्यांनी खालेक पेंटर यांनी मांडलेल्या मुद्यानुसार अहवालावर सविस्तर चौकशी करुन आवश्यकता असल्यास अभिलेखे तपासून चौकशी अहवाल सादर करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती.
४त्यात हज हाऊसच्या बांधकामासाठी वापरलेल्या निधीचा उल्लेख करण्यात आला आहे. एक महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले होते मात्र शनिवारपर्यंत अहवाल दाखल नव्हता, असे खालेक पेंटर म्हणाले.

Web Title: Haj's work is dismal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.