हाैशी सायकलपटू रमले हिमायत बागेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:26+5:302020-12-17T04:27:26+5:30

औरंगाबाद : हिमायत बागेतील पुरातन इमारती व झाडांची वैविध्यता पाहून हाैशी सायकलपटूही भारावले होते. सायकल फाॅर हेरिटेज उपक्रमाची दुसरी ...

Haishi cyclists play in Himayat Bagh | हाैशी सायकलपटू रमले हिमायत बागेत

हाैशी सायकलपटू रमले हिमायत बागेत

औरंगाबाद : हिमायत बागेतील पुरातन इमारती व झाडांची वैविध्यता पाहून हाैशी सायकलपटूही भारावले होते. सायकल फाॅर हेरिटेज उपक्रमाची दुसरी सायकल फेरी रविवारी हिमायत बागेत गेली होती. त्यात २०० हून अधिक सायकलपटूंनी सहभाग नोंदवला.

गेट गोईंग, सायकलिस्ट फाऊंडेशन, औरंगाबादी मुसाफिर, औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशन, अमेझिंग औरंगाबाद यांनी मनपासह स्मार्ट सिटीच्या सहयोगातून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘सायकल फाॅर हेरिटेज’ हा उपक्रम सुरू केला आहे. सहभागी हाैशी सायकलपटूंनी रविवारी सकाळी सिडको बसस्थानकापासून सायकल फेरीला सुरुवात केली. मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या हस्ते फेरीची सुरुवात करण्यात आली. तेथून हर्सूल टी पाॅइंट ते हिमायत बाग आणि परत अशी १८ किलोमीटर सायकल चालवली. यात सहा ते ७४ वर्षांहून अधिक वयाच्या सायकलपटूंनी मोठ्या हाैशेने भाग घेतला. हिमायत बागेतील पुरातन वास्तूसह येथील वैविध्यपूर्ण झाडांची माहिती हिस्ट्री सोसायटीचे ॲड. स्वप्नील जोशी आणि आदित्य वाघमारे यांनी दिली.

सायकल फाऊंडेशनचे डाॅ. विजय व्यवहारे, डाॅ. उमा महाजन, श्रीनिवास देशमुख, डाॅ. प्रणव महाजन, विजयकुमार कटके, हसन देवलीकर, अंजली पिंप्रीकर, सुप्रिया जाधव, डाॅ. मंजूषा देशींगकर, श्रीजा व्यवहारे, प्राजक्ता जाधव, डाॅ. अश्विनी टाक, अजित काकडे, प्राजक्ता शिंदे, जयंत सांगवीकर यांच्यासह २०० हून अधिक जणांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. गेल्या महिन्यात दिल्ली गेट आणि बीबी का मकबरा येथे भेट देण्यात आली होती. शहर राज्याची पर्यटन राजधानी आहे. जागतिक वारसा स्थळे दुर्लक्षित आहे. त्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे विजय व्यवहारे यांनी सांगितले.

Web Title: Haishi cyclists play in Himayat Bagh