गारपीटग्रस्तांच्या बंँकेत वाऱ्या सुरूच

By Admin | Updated: July 8, 2014 01:01 IST2014-07-07T22:56:44+5:302014-07-08T01:01:33+5:30

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहक ारी बँके त गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाई वाटपात विलंब करुन आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

The hailstorm hits the winds | गारपीटग्रस्तांच्या बंँकेत वाऱ्या सुरूच

गारपीटग्रस्तांच्या बंँकेत वाऱ्या सुरूच

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहक ारी बँके त गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाई वाटपात विलंब करुन आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या बँके त दलालांची संख्या वाढली आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
परिसरात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या अवक ाळी पाऊ स व गारपिटीमुळे शेतक ऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या गारपिटीमुळे हतबल झालेल्या शेतक ऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने ११ गावांतील ५ हजार ८१० गारपीटग्रस्तांना १ क ोटी ८० लाख ४८ हजार ६६२ रु पये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके त प्राप्त झाले होते. मात्र दोन महिन्यांपासून शेतक री नुक सान भरपाई मिळावी म्हणून बँके त चकरा मारत आहेत. शाखाधिक ारी राजेश मस्के व भाग चौकसनीस आर.बी. बाहेक र हे बँकेत वेळेवर येत नसून खातेदारांना योग्य माहिती देत नसल्याने शेतक ऱ्यांना कि ती व क धी नुक सान भरपाई मिळणार? असा प्रश्न गारपीटग्रस्त शेतकरी करीत आहे. बँकेत खातेदारांना पुस्तिक ा दिली जात नाही, नुकसान भरपाईची यादी लावण्यात आली नाही, नुकसान भरपाई कि ती हे सांगितले जात नाही. खाते नंबर विचारल्यानंतर मिळत नाही. दलालांशिवाय कामे होत नसल्याने शेतक री त्रस्त झाला असल्याचे कै लास सरक टे, कै लास पवार, रामेश्वर क ांगणे, ज्ञानेश्वर राऊत यांनी सांगितले. याबाबत शाखाधिकारी मस्के यांना विचारले असता, शेतकऱ्यांना नेमकी किती नुकसान भरपाई वाटप करण्यात आली, हे सांगता येणार नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
अनुदान वाटपास विलंब
तळणी शाखेतील अधिकारी बँकेत वेळेवर उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना बॅँकेत ठाण मांडून बसावे लागते. अधिकारी आले तरी ते शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने अनुदान वाटपाचा बोजवारा उडला आहे.
तळणी शाखेने अनुदानप्राप्त शेतकऱ्यांची यादी लावलेली नाही. त्यामुळे कुणाचा पायपोस कुणाला नसल्याचे दिसून येते.

Web Title: The hailstorm hits the winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.