मोकाट कुत्र्यांचा हैदोस
By Admin | Updated: June 2, 2015 00:32 IST2015-06-02T00:32:30+5:302015-06-02T00:32:30+5:30
औरंगाबाद : शहरात रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच असून, सोमवारी एका मोकाट कुत्र्याने दोन महिला आणि एका १६ वर्षीय मुलाचे लचके तोडल्याची घटना घडली.

मोकाट कुत्र्यांचा हैदोस
औरंगाबाद : शहरात रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच असून, सोमवारी एका मोकाट कुत्र्याने दोन महिला आणि एका १६ वर्षीय मुलाचे लचके तोडल्याची घटना घडली.
यावेळी कुत्र्याने चेहऱ्यास चावा घेतल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. एकीकडे ही परिस्थिती असताना घाटी रुग्णालयात अॅन्टी रेबीज सिरमचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
कुत्रा चावल्यानंतर उपचार घेण्यासाठी घाटी रुग्णालयात रोज सरासरी पाच ते सहा रुग्ण येतात. यात बरेच रुग्ण पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे थेट घाटीत येतात.
४पाच महिन्यांत ३३६ जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्वांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.