हदगावचे फौजदार निलंबित

By Admin | Updated: August 14, 2014 02:09 IST2014-08-14T01:57:25+5:302014-08-14T02:09:24+5:30

हदगाव : हदगावचे पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांना पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी तडकाफडकी निलंबित केले.

Hadegaon army suspended | हदगावचे फौजदार निलंबित

हदगावचे फौजदार निलंबित

हदगाव : स्थानिक समाजकंटकांना हाताशी धरुन हदगाव येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, पोलिस विभाग व शासनाविरुद्ध कटकारस्थान रचण्याचे षडयंत्र रचणे आदी आरोपाखाली हदगावचे पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांना पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी तडकाफडकी निलंबित केले.
पोलिस उप निरीक्षक गणेश मुंडे मागील दीड वर्षांपासून हदगाव येथे कार्यरत होते. पोलिस खात्यात काम करत असताना शिस्त अत्यंत महस्त्वाची ठरले. मात्र त्याला हरताळ फासण्याचे काम मुंडे यांनी फौजदार म्हणून काम करताना केल्याचा आरोप आहे.
समाजकंटकांना हाताशी धरुन हदगावचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अरुण बस्ते यांची बदली करण्यास भाग पाडले होते. एकूणच मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांच्या तक्रारी होत्या.
कार्यालयीन माहिती किंवा अवैध व्यवसायावर धाड टाकण्याचे ठरताच संबंधितांना याची माहिती कळविणे, समाजकंटकांना हाताशी धरुन षडयंत्र रचणे, अवैध व्यवसाय सुरु करुन ‘दक्षिणा’ वसूल करणे आदींचे आरोप मुंडे यांच्यावर होते.
असाच एक संदेश मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला व ते रेकॉर्ड खात्यातील वरिष्ठांच्या हाती पडले. चौकशीअंती पोलिस अधीक्षक दहिया यांनी मुंडे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला.
पोलिस उपनिरीक्षक मुंडे यांच्यावर ठेवलेल्या ठपक्यानुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. (वार्ताहर)

Web Title: Hadegaon army suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.