पोलीस कारवाईनंतर शहरात गुटख्याचा तुटवडा
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:07+5:302020-12-03T04:10:07+5:30
औरंगाबाद : गुटखा व्यावसायिकांची पाळेमुळे पोलिसांनी शोधण्यास सुरुवात करताच त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. शहरातील छोटे-मोठे व्यावसायिक भूमिगत ...

पोलीस कारवाईनंतर शहरात गुटख्याचा तुटवडा
औरंगाबाद : गुटखा व्यावसायिकांची पाळेमुळे पोलिसांनी शोधण्यास सुरुवात करताच त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. शहरातील छोटे-मोठे व्यावसायिक भूमिगत झाले आहेत. बाजारात नवीन माल भेटायला तयार नाही. ज्या दुकानदारांकडे जुना स्टॉक शिल्लक आहे त्यांनी चढ्या दराने विक्री करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन पेक्षाही अधिक दराने सध्या गुटख्याची विक्री सुरू आहे.
मागील आठवड्यात शहर पोलिसांनी एका ट्रान्सपोर्ट मार्फत आलेला पंचवीस लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने शहरातील गुटखा व्यवसायिकांना मोठा हादरा बसला. शहरात हा माल कोठून येत होता? शहरात कोणकोणत्या व्यापाऱ्यांचा हा माल होता? याची पाळेमुळे पोलिसांनी शोधायला सुरुवात केली. इंदूर शहरातून हा माल आल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने पोलिसांनी तेथेही खातरजमा केल्याचे कळते. पोलिसांनी गुटखा व्यवसायावर कडक निर्बंध टाकण्यास पाऊल उचलताच शहरातील लहान-मोठे व्यापारी भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी पकडलेल्या मालाशी ज्या व्यापाऱ्यांचा संबंध नाही ते बिनधास्त शहरात फिरत आहेत.
पोलिसांच्या मोठ्या कारवाईनंतर शहरात गुटखा येणे बंद झाले आहे. गुटखा विक्री करणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदारांना माल मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे त्यांनी चढ्या दराने विक्री करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये जेवढा गुटखा महाग मिळत नव्हता तेवढा आता महाग मिळत आहे.