गुटखा विक्री करणाऱ्याला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:04 IST2021-07-27T04:04:21+5:302021-07-27T04:04:21+5:30

---------------------------------------------------- अनैसर्गिक कृत्‍याचा प्रयत्‍न करणारा तुरुंगात औरंगाबाद : आठ वर्षाच्या बालकासोबत अनैसर्गिक कृत्‍य करण्‍याचा प्रयत्‍न करणारा अभियांत्रिकीचा विद्यार्थी ...

Gutkha seller arrested | गुटखा विक्री करणाऱ्याला पोलीस कोठडी

गुटखा विक्री करणाऱ्याला पोलीस कोठडी

----------------------------------------------------

अनैसर्गिक कृत्‍याचा प्रयत्‍न करणारा तुरुंगात

औरंगाबाद : आठ वर्षाच्या बालकासोबत अनैसर्गिक कृत्‍य करण्‍याचा प्रयत्‍न करणारा अभियांत्रिकीचा विद्यार्थी काझी मुनीब काझी तौसिफ याची न्‍यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्‍याचे आदेश विशेष सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दिले.

---------------------------------------------------

मुलासोबत अश्लिल कृत्‍य करणारा हॉस्‍टेलचा वाॅर्डन कारागृहात

औरंगाबाद : हॉस्‍टेलवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्‍य करणारा हॉस्‍टेलचा वाॅर्डन जयसिंह दलपतसिंह राजपूत याची न्‍यायालयीन कोठडीत हर्सुल कारागृहात रवानगी करण्‍याचे आदेश विशेष सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दिले.

-----------------------------------------------

वर्षावासाला प्रारंभ

औरंगाबाद : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान वर्षावासाला सुरुवात झाली असून, या वर्षावासानिमित्त ऑनलाइन ग्रंथ वाचन कार्यक्रमाचे उद्‌घाटन भोईवाडा येथील शाक्य पुत्र बुद्ध विहार येथे झाले. शनिवारी सकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथ वाचनाचे उद्‌घाटन भारतीय बौद्धमहासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वर्षावासाचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष रमेश बनसोडे यांनी केले.

----------------------------------------------------

Web Title: Gutkha seller arrested