वैजापूर तालुक्यात गुटखा पकडला, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:38+5:302020-12-04T04:08:38+5:30
माळी-घोगरगाव ते गाढेपिंपळगाव रस्त्यावर कारमधून प्रतिबंधित गुटखा आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ...

वैजापूर तालुक्यात गुटखा पकडला, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
माळी-घोगरगाव ते गाढेपिंपळगाव रस्त्यावर कारमधून प्रतिबंधित गुटखा आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सापळा रचला. साडेसात वाजेच्या दरम्यान या ठिकाणारून पांढऱ्या रंगाची कार येतांना दिसली. या कारला थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा असलेल्या १२ गोण्या आढळून आल्या. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक गणेश राऊत, संदीप सोळंके, विक्रम देशमुख, विठ्ठल राख, दीपेश नागझरे, वाल्मिक निकम, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, संतोष डमाळे यांनी ही कारवाई केली.
फोटो -